ठाणे : मागिल महिनाभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने काल रात्रभर थैमान घातले. एका रात्रीत तब्बल शंभर मि .मी. पावसाची ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस ठाण्याला ऑरजें इशारा देण्यात आला असून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काल रात्री ११.३० वाजता पावसाला सुरुवात झाली होती. रात्री १.३० ते २.३०च्या दरम्यान पावसाचा जोर वाढला होता. या दरम्यान तब्बल ६० मि .मी. पेक्षा जास्त पाऊस पडला होता. मुसळधार पावसामुळे शहरातील वीज अनेक वेळा गेल्याने ठाणेकरांना मनस्ताप झाला होता.
ठ ा णे श ह र ा त स ो म व ा र ी सकाळपर्यंत ११६.८३ मि .मी. पाऊस पडला असून आतापर्यंत ठाण्यात २२७.७६ मि .मी. पाऊस झाला. मागि ल वर्षी याच दि वशी ७९१.३४ मि .मी. पावसाची नोंद झाली होती. काल रात्रीत ११ झाडे उन्मळून पडली तर पाच झाडाच्या फ़ांद्या तुटून पडल्या होत्या. दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. सहा ठिकाणी पाणी तुंबल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभ ागाकडे करण्यात आली. महागि री कोळीवाडा येथि ल एका इमारतीची गॅलरी पडल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान हवामान खात्या ने आजपासून २ जुलैपर्यंत ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त के ली असली तरी आज दि वसभरात फक्त ०.७५ मि .मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.