ठाणे: सुपर स्पेशालिटी रुग्णालय झालेल्या सिव्हिल रुग्णालयात आगामी नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात झाले असून अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या रुग्णालयात ९०० रूग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे होणाऱ्या नोकरभरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत त्यांनी शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार आणि विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह श्री. शिंदे यांची भेट घेतली होती.
स्थानिक शाखाप्रमुख संतोष रेवाळे, राहुल नागरगोजे, चंद्रकांत (पप्पू) मोर, मनोज करपे, धनंजय बडे, संतोष कडव आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबत मागणी केली होती.