कसारा : अनेक दिवसांपासून कसारा येथील उबाठा गटात पक्षांतर्गत सुरु असलेल्या असंतोषाचा अखेर उद्रेक होऊन येथील १००हून अधिक पुरुष तथा महिला शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश घेतला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापुरातील सेना मध्यवर्ती कार्यालयात आज गुरुवारी तालुक्यातील ठाकरे गटातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून उपनेते प्रकाश पाटील, संपर्क प्रमुख निलेश भांडे, तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, उपतालुका प्रमुख संतोष लहाने यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला. यामध्ये कसारा येथे वास्तव्यास असलेले उबाठा गटाचे पूर्वाश्रमीचे उपतालुका प्रमुख बंधु सोड़नर, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विजय शिंदे, शिवाजी भोसले, माजी शाखा प्रमुख महेश गिलंदे, संदिप शिंदे, गोविंद तळपाड़े,कृष्णा धोंगडे, सुरेश पांडे, लता खानझोड़े आणि सहकारी महिला आदिं सह 100 पेक्षा अधिक शिवसैनिकांनी मशाल सोडून धनुष्य हाती घेतल्याने कसा-यात शिंदे गट प्रबळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.