वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान टाळणारे ‘पितांबरी वन्यप्राणी रोधक’

शेतकऱ्यांसाठी बिनविषारी, पर्यावरणपूरक उत्पादन

ठाणे: अभिनव आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या पितांबरी कंपनीने आपल्या ॲग्री केअर विभागांतर्गत खास शेतकऱ्यांसाठी ‘पितांबरी वन्य प्राणी रोधक’ हे उत्पादन नव्यानेच बाजारात उपलब्ध केले आहे.

नुकतेच पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई, उपाध्यक्ष परीक्षित प्रभुदेसाई यांच्या हस्ते या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सीओओ माधव पुजारी, ॲग्री विभागाचे मॅनेजर अजिंक्य नाईक व प्रसाद गोसावी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी आणि चांगले उत्पादन प्राप्त व्हावे यासाठी पितांबरीने विविध कृषी उत्पादनांची निर्मिती केली आहे. अलीकडे वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांची नासधूस होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी; शेतकऱ्यांना पिकांचे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

‘पितांबरी वन्यप्राणी रोधक’उत्पादनामुळे शेताची, फळबागांची नासधूस करणाऱ्या माकड, साळींदर, उंदीर, नीलगाय, ससा, खार, हरीण, हत्ती यांसारख्या वन्यप्राण्यांपासून प्रभावी संरक्षण मिळते. जमीन उकरणे, मूळ नष्ट करणे असा उपद्रव रोखते.

कोकणात व इतर ठिकाणी फिरताना अनेक शेतकऱ्यांकडून ही समस्या समोर आली. त्यामुळे यावर ठोस उपाय आणायचे ठरवले. विविध ठिकाणी अनेक प्राण्यांवर आम्ही याच्या ट्रायल घेतल्या आणि त्या यशस्वी झाल्यावर आम्ही हे उत्पादन बाजारात आणले आहे. बिनविषारी, पर्यावरणपूरक आणि पिकांसाठी हे अतिशय सुरक्षित आहे. हे उत्पादन वापरून पाहण्यासाठी किंवा त्याविषयी अधिक माहितीसाठी कृषी सेवा समिती तसेच पितांबरीशी संपर्क साधावा, असे आवाहन पितांबरी कृषी विभागाने केले आहे.