अमली पदार्थांच्या जनजागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्या-समीर वानखेडे

शहापूर: आसनगाव जोंधळे नॉलेज सिटी येथे शिवाजीराव एस. जोंधळे विधी आणि संशोधन संस्था यांच्यावतीने अमली पदार्थ आणि द्रव्ये अधिनियम, १९८५- अंमलबजावणी आणि आव्हानं ” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर, तसेच माजी झोनल संचालक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई, समीर वानखेडे उपस्थित होते.समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एन.डी.पी.एस. कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी,कायदेशीर जागरूकतेचे महत्त्व आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुण पिढीची जबाबदारी यावर सखोल विवेचन केले. त्यांनी तरुणांना “कायद्याचा अभ्यास केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर समाजात परिवर्तन घडविण्याच्या हेतूने करावा असा प्रेरणादायी संदेश दिला.

डॉ. पूर्णिमा सुर्वे यांनी आपल्या आपल्या मनोगतात सांगितले की कायद्याचं शिक्षण हे केवळ न्यायालयीन प्रक्रिया समजून घेण्यासाठी नाही, तर न्याय, नैतिकता आणि मानवतेची मूल्यं समाजात रुजविण्यासाठी आहे. “शिक्षण हे केवळ ज्ञान देत नाही, ते व्यक्तिमत्व घडवतं आणि तीच खरी कायद्याची ताकद आहे.

कार्यक्रमाला नॉलेज सिटीतील विविध संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेच्या शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी समितीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.