ठाणे : येत्या रविवारी २१सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
हे सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका येथून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणारे सूर्यग्रहण
२ आगस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे श्री.सोमण म्हणाले.