राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या भाजपात

मुंबई: विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात येणारा ओघ कायम असून आज ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार ॲड.निरंजन डावखरे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, भाजपा प्रदेश महासचिव व विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, तसेच ठाणे-पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, पत्रकार व भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपाचा किल्ला आणखी भक्कम झाला आहे.