मुंबई: देशासह महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सकाळी ७ वाजेपासून मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह पाहायला मिळाला. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगाव ५१.९८, रावेर ५५.३६, जालना ५८.८५, छत्रपती संभाजीनगर ५४.०२, मावळ ४६.०३, पुणे ४४.९०, शिरूर ४३.८९, अहमदनगर ५३.२७, शिर्डी ५२.२७ आणि बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान हे नंदुरबारमध्ये आणि सर्वात कमी ४३.८९ टक्के मतदान शिरूरमध्ये झाले आहे.
देशात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६२.३१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आंध्र प्रदेशात ६८.०४,बिहार ५४.१४, जम्मू-काश्मीर ३५.७५, झारखंड ६३.१४, मध्यप्रदेश ६८.०१ टक्के, महाराष्ट्र ५२.४९, ओडिशा ६२.९६, तेलंगणा ६१.१६, उत्तरप्रदेश ५६.३५ आणि पश्चिम बंगालमध्ये ७५. ६६ टक्के इतके मतदान झाले आहे. या आकडेवानुसार सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये ७५.६६ टक्के मतदान तर सर्वात कमी ३५.७५ टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. त्यामुळे आता मतदान संपेपर्यंत देशात आणि राज्यात चौथ्या टप्प्यात एकूण किती टक्के मतदान होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.