साधना सरगम-अभिजीत भट्टाचार्य यांच्या स्वरांत शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल बहरला

अंबरनाथ: साधारण नव्वदीच्या काळात आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या गायिका साधना सरगम आणि गायक अभिजित भट्टाचार्य या दोघांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथमधील शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजवला.

अंबरनाथमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी गायिका साधना सरगम यांनी हर किसीं को नहीं मिलता यहा प्यार जिंदगी मे, आप के या जाने से, दिल बहल जाता हे, धिक बजने लगा, मिले सूर मेरा तुम्हारा, जब कोई बात बिगड जाये, अशी गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली तर आणि गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी तुम दिलकी धडकन हो, बडी मुश्किल है, बस इतनासा ख्वाब है, सुनो ना सुनो ना, सून लो ना अशी एकापेक्षा एक सरस गाणी म्हणून रसिकांनी वन्समोअरची दाद दिली.

गायिका साधना सरगम यांनी पहला नशा, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, आप के आ जानेसे, जब कोई बात बिगड जाये, रंगीला रे, ढोल बजने लगा, जय हो, मिले सुरू मेरा तुम्हारा अशी त्यांची गाजलेली गाणी सादर केली. या गाण्यांना तरुणाईने मोठी दाद दिली.

फेस्टिवलला निमंत्रित केल्याबद्दल साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य यांनी आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले.

आर्ट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने रसिक हजेरी लावल्याने फेस्टिवल परिसर हाऊसफुल्ल झालेच, पण बाहेरच्या परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर अंबरनाथकरांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. फेस्टिव्हलच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी गायक सोनू निगम यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे.