ठाणे : महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा विचारे (९) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी मलेशियामधील सर्वात उंच माउंट किनाबालु ४,०९५ मिटर उंचीचा पर्वत सर करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
माउंट किनाबालु सर करणारी ग्रिहिथा ही भारतातील पहिली सर्वात तरुण महिला ठरली आहे. ग्रिहिथाने तिचा प्रवास बोर्निओच्या टिंपोहोन गेटपासून २३ जानेवारीला सुरू केला आणि २६ जानेवारीला सकाळी ७:३० वाजता तिने माउंट किनाबालुचा शिखर गाठला.
ग्रिहिथाने शिखराच्या माथ्यावर पोहोचून भारताचा तिरंगा फडकवला. भरताच्या तिरंग्यासोबत नेहमीप्रमाणे तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वजही फडकवला. ४,०९५ मीटर (१३,४३५ फूट) उंचीसह माउंट किनाबालु हे तिसरे पृथ्वीवरील बेटाचे सर्वोच्च शिखर आहे.
या मोहिमेला खासदार राजन विचारे आणि शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी ग्रिहिथाच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन मोहिमेसाठी शुभेच्छा आणि आशिर्दवा दिले होते. याआधी ग्रिहिथाने आं तरराष्ट्रीय पातळीवरचे जगातला सर्वात उंच शिखर माउंट किलीमांजारो आफ्रिका आणि नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहेत.