ठाणे : महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा विचारे (९) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी मलेशियामधील सर्वात उंच माउंट किनाबालु ४,०९५ मिटर उंचीचा पर्वत सर करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. माउंट किनाबालु सर करणारी ग्रिहिथा ही भारतातील पहिली सर्वात तरुण महिला ठरली आहे. ग्रिहिथाने तिचा प्रवास बोर्निओच्या टिंपोहोन गेटपासून २३ जानेवारीला सुरू केला...