आत्मविश्वपूर्ण दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडला २४ वर्षांनी विश्वचषकात हरवू शकेल?

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ गेल्या काही वर्षांत विश्वचषक जिंकण्याच्या जवळ जरूर आले तथापि, त्यांच्या चाहत्यांसाठी हे निराशाजनक आहे, की हे दोन्ही संघ अंतिम पायरी चढू शकले नाही.

या विश्वचषकातही ते ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये आहेत ते पाहता ते उपांत्य फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. यावेळी आपण नवीन विश्वविजेता पाहू शकतो का? फायनलला अजून २० दिवस बाकी असताना, आजचा सामना हा फायनलची ड्रेस रिहर्सल किंवा किमान उपांत्य फेरीची ड्रेस रिहर्सल असू शकते.

१ नोव्हेंबर रोजी, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या ३२ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील.

 

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी १९९२ ते २०१९ दरम्यान एकमेकांविरुद्ध ७१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने ४१ जिंकले आहेत, न्यूझीलंडने २५ जिंकले आहेत आणि पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी फक्त एक सामना खेळला आहे, जो न्यूझीलंडने जिंकला. विश्वचषकात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ६-२ अशा फरकाने वर्चस्व गाजवले. १९९९ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता.

  न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने २५ ४१
भारतात
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेची आतापर्यंतची कामगिरी

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला सातवा सामना खेळतील. त्यांनी खेळलेल्या सहा सामन्यांपैकी न्यूझीलंडने चार जिंकले आणि दोन गमावले, तर दक्षिण आफ्रिकेने पाच जिंकले आणि एक हरले. न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांनी लागोपाठ मागील दोन सामने गमावले आहेत.

सामना क्रमांक न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका
इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव
नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव
बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव नेदलँड्सकडून ३८ धावांनी पराभव
अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव
भारताकडून ४ विकेटने पराभव बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव पाकिस्तानचा १ विकेटने पराभव

 

संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.

 

दुखापती अपडेट्स

या विश्वचषकात फक्त एक सामना खेळलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. तो लॉकी फर्ग्युसनची जागा घेऊ शकतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विल्यमसन खेळा बाहेर होता. याशिवाय, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसाठी इतर दुखापतींची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील तिसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे खेळले गेलेले पहिले दोन सामने जिंकले आहेत. येथे बघण्यात आले आहे कि दुसऱ्या डावात दव पडल्याने फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि लक्ष्याचे पाठलाग करणे सोपे जाते.

 

हवामान

हवामानात भरपूर सूर्यप्रकाश दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन आणि पावसाची शक्यता नाही. वारा पूर्वेकडून वाहेल.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

रचिन रवींद्र: न्यूझीलंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हा डावखुरा फलंदाज जेव्हा खेळतो तेव्हा नेत्रसुख देऊन जातो. तो त्याच्या संघासाठी सहा सामन्यांत ८१ च्या सरासरीने आणि १०८ च्या स्ट्राईक रेटने ४०६ धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तो एक सुलभ डाव्या हातचा स्पिनर देखील आहे ज्याच्या नावावर तीन विकेट्स आहेत.

मिचेल सँटनर: न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज या विश्वचषकात एका फायफरसह सहा सामन्यांत १४ विकेट्स घेऊन उत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तो खालच्या क्रमवारीत बॅटनेही उपयुक्त आहे. त्याने नाबाद ३६ धावांची खेळी पण केली आहे

क्विंटन डी कॉक: आक्रमक डावखुरा सलामीवीर आणि यष्टिरक्षक याने या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने सहा सामन्यांत ७२ च्या सरासरीने आणि ११७ च्या स्ट्राईक रेटने ४३१ धावा केल्या आहेत.

मार्को जॅन्सन: दक्षिण आफ्रिकेच्या उंच डावखुरा वेगवान गोलंदाजाने सहा सामन्यांत १३ बळी घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाचाही संघाच्या यशात मोलाचा वाटा आहे. त्याने १४३ धावा केल्या आहेत ज्यात नाबाद ७५ चा समावेश आहे.

 

आकड्यांचा खेळ

  • टेंबा बावुमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ४६ धावांची गरज
  • लॉकी फर्ग्युसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज
  • टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ५६ धावांची गरज
  • जिमी नीशमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची गरज
  • विल यंगला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ९ धावांची गरज
  • केन विल्यमसनला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ११ धावांची गरज
  • ट्रेंट बोल्टला विश्वचषकात ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी २ विकेट्सची गरज
  • विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या एबी डीव्हिलर्सची (४) बरोबरी करण्यासाठी क्विंटन डी कॉकला (३) एका शतकाची गरज

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १ नोव्हेंबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)