मुंबई: शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीने महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत आश्चर्याचा धक्का दिला. आज राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी दिग्गजांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. हा निर्णय आमदारांना मान्य आहे. आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक वर्षानंतर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याची चर्चा असतानाच आज रविवारी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० आमदारांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले. आज राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे, आदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे आदींसह अन्य आमदार उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उप मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी अन्य आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असून राष्ट्रवादीने सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
पुन्हा जनतेत जाणार-शरद पवार
सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवली होती. पण त्याआधीच काही जणांनी वेगळी भूमिका घेतली. कुणी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत, असे शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले, असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, विरोधीपक्ष नेतेपदाचा अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे आता समजले. राष्ट्रवादीचे बडे नेते सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही सहकारी संपर्कात आहेत, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले. आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. जे घडले त्यामुळे मी चिंतेत नाही. याआधीही 1980 साली असा प्रकार घडला होता. मी फक्त काही जणांचाच नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला होता. त्यावेळी पक्ष सोडून गेलेले सर्व पराभूत झाले होते, राज्यातील मतदारांवर माझा विश्वास आहे, असे म्हणत पुन्हा पक्ष बांधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत. तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती?
अजित पवार-जलसंपदा, छगन भुजबळ-अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील-ऊर्जा हसन मुश्रीफ-कौशल्य विकास, धनंजय मुंडे-गृहनिर्माण, आदिती तटकरे- महिला व बालकल्याण-संजय बनसोडे-पर्यटन, अनिल पाटील-लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम-आदिवासी कल्याण
राष्ट्रवादीचे प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपद आव्हाडांकडे
अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबद…