ठाणे: प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजारप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे.
शासकीय कारवाई करताना ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आले तर काही शाळांनी पुनःश्च शाळा सुरू न करण्याचे हमी पत्र सादर केले. अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
अंबरनाथ तालुक्यात गोकुळ कॉन्व्हेट स्कूल, समर्थ स्कूल नेवाळी,सनशाईन इंग्लिश स्कूल, उमरोली, विवेकानंद इंग्लिश स्कूल अडीवली, निलम इंग्लिश स्कुल अडीवली, गायत्री विद्यामंदीर, ऑरबिट इंग्लिश स्कुल अडीवली (प्रा.) आणि गगनगिरी इंग्लिश स्कुल अडीवली (प्रा) या शाळा अनधिकृत आहेत.
भिवंडी तालुक्यात नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे, देविका इंग्लिश मिडियम स्कूल काल्हेर, द विनर्स इंग्लिश मिडियम स्कूल कांबे, अवेंचुरा इंग्लिश स्कूल कोन, अग्निमाता इंग्लिश स्कूल पिंपळास, व्हि.पी. इंग्लिश स्कूल पिंपळास, समर्थ विद्यालय तलाईपाडा पिंपळनेर, सुगराबिबी इंग्लिश स्कूल, तळवली, ग्लोबल इंग्लिश स्कूल, वडूनवघर, इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंदेफाटा, इकरा इंग्लिश स्कूल, पडघा आणि प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, भोईरपाडा या शाळा अनधिकृत आहेत.
कल्याण तालुक्यात जी.के. इंग्लिश हायस्कूल खडवली, डिन्गेटी कॉन्व्हेट स्कूला कोळेगांव, नवज्योती बेथनी विद्यापिठ रुंदे, युनिक इंग्लिश मिडियम स्कूल टिटवाळा, सरस्वती इंग्लिश स्कूल दहिसर, आयडीएल इंग्लिश स्कूल दहिसर, सावित्रिबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हारळ, सिबॉयसीस इंग्लिश स्कूल, कोंदेरी, रायन इंटरनॅशनल स्कूल, रुणवान गार्डनजवळ डोंबिवली (पु.) आणि बी.बी.आर.आर.टी..स्कूल, कांबा म्हारळ या शाळा अनधिकृत आहेत.
शहापुर तालुक्यात एम.आर.राणे इंग्लिश स्कूल, आसनगांव, शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शेरे आणि एम.जे.वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल आदिवली या शाळा अनधिकृत असून पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नयेत असे जिल्हा परिषदेने आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन मान्यता असलेल्या शाळेत पाल्याचे प्रवेश घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
पालकांनी शाळा संदर्भातील माहिती घेऊन शाळेत प्रवेश घेतले तर अनधिकृत शाळा बंद होतील, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.