कल्याण : कल्याण येथील रायता- दहागाव मार्गावर असणाऱ्या बांधणी पाडा येथील एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा आपघात घडला.
या घटनेत घरातील कुटूंब सुदैवाने बचावले आहे. घराचे खूप मोठे नुकसान झाले असून एक चार चाकी व एक दुचाकी चक्काचूर झाली आहे. ट्रक चालक दारूच्या नशेत भर वेगाने सिमेंट भरून नेणारा कंटनेर नेत असताना गाडी वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र कुटुंब नुकसान भरपाईची मागणी करत आहे.