२२ मतदान केंद्रांची दोरी महिलांच्या हाती

ठाणे, कल्याण, भिवंडीत ६५९२ मतदान केंद्रे

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघांची निवडणूक महिला अधिका-यांच्या हाती देण्यात आली आहे. 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत 65 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ज्या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त महिला मतदार आहेत, तेथील मतदान केंद्रांचे संपूर्ण कामकाज महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. जिल्ह्याभरात 22 मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातील मतदारांना मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाभरात तब्बल 6592 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यापैकी 22 मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस आदी मनुष्यबळ फक्त शंभर टक्के महिलांचे राहणार आहे. महिला मतदान केंद्रांप्रमाणेच दिव्यांगांसाठीही 18 विधानसभा मतदारसंघात, प्रत्येकी एक युवा मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यामध्ये 29 लाख 94,315 महिला मतदार आहेत. या महिलांपैकी ज्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे, तेथे महिला मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. त्यासाठी 22 मतदाना केंद्र निश्चित केली आहेत. मतदान अधिकारी, जनसंपर्क अधिकारी आणि अधिकारी यांच्यासह शिपाई, पोलीस आणि सेवक आदी सर्व महिला केंद्रांवर सेवा, मदत देणार आहेत.

ठाणे तालुक्यात दहा केंद्र असून कल्याण तालुक्यात चार तसेच भिवंडीत तीन यासह शहापूरमध्ये एक, मुरबाडमध्ये एक, अंबरनाथमध्ये एक, उल्हासनगरमध्ये एक आणि बेलापूरमध्येही एक मतदान केंद्र आहे. जिल्ह्यातील 6592 मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.