मलाबार गोल्डचे ‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ अभियानाचे १५ वे पर्व

ठाणे: जगातील सर्वात मोठे ज्वेलरी रिटेलर्स मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ हे अभियान जाहीर केले आहे. याद्वारे भारतातील विविधता व नववधूंसाठीच्या दागिन्यांचा खास अनोखा संगम यात पाहण्यास मिळतो.
या विशेष अभियानात २२ नववधू आणि १० नामवंत सेलिब्रिटींचा सहभाग असून त्यात अभिनेत्री आलिया भट्ट, करिना कपूर, अनिल कपूर, मानसी पारेख आणि प्रार्थना बेहरे यांचा समावेश आहे. ब्राइड्स ऑफ इंडिया या कलेक्शनमध्ये भारतीय वारसा आणि मंदिर स्थापत्यकलेपासून प्रेरित ‘डिव्हाइन कलेक्शन’ आहे. रुबी, एमराल्ड व सॅफायरसारख्या मौल्यवान रत्नांनी बनविलेले ‘प्रेशिया कलेक्शन’ तसेच आधुनिकतेसोबत परंपरेचा सुरेख संगम असणाऱ्या ‘डायमंड कलेक्शन’चा समावेश आहे.
मलाबारची ही १५ वी आवृत्ती देशातील सर्व नववधूसाठी शुभेच्छांचे प्रतीक आहे. परंपरा आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचा सुंदर संगम यातून साकारला जात आहे. विविध दागिने खरेदी करण्यासाठी ठाण्यातील गोखले रोड येथे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या दालनात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.