सिद्धगडावर पर्यटक दरीमध्ये पडून बेपत्ता

मुरबाड: मुरबाड तालुक्यातील सिध्दगडावर काल रविवारी एक पर्यटक दरीमध्ये पडून बेपत्ता झाला. या तरुणाला शोधण्यात गिर्यारोहकांना यश आले आहे. साईराज चौहान (22) राहणार नवी मुंबई असे त्याचे नाव आहे.

सोमवारी सकाळी दरीमध्ये तो पडल्याचे ठिकाण गिर्यारोहकांनी शोधून काढले आहे. परंतु डोंगरावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह, पाऊस, धुके आणि निसरडे झालेले खडक यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण काम झाले आहे. नाईलाजाने सोमवारी सायंकाळी तरुणाला बाहेर काढण्याचे काम थांबवण्यात आले. मंगळवारी सकाळी पुन्हा ही मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली.

या पर्यटकाला शोधण्यासाठी लोणावळा, शहापूर येथून गिर्यारोहकांच्या टीम सिद्धगडावर दाखल झाल्या आहेत.

मुंबई येथील १८ पर्यटक मुरबाडपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धगड येथे रविवारी फिरण्यासाठी आले होते. त्यांच्यापैकी नवी मुंबई येथे राहणारा साईराज चौहान हा 22 वर्षीय तरुण गडावरून रविवारी खाली पडला.