महाराष्ट्र

युवासेनेचे दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश

युवासेनेचे दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश
युवासेनेचे दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश फोटो: ठाणे वैभव
कल्याण: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. युवासेना सचिव, तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मातोश्री येथे पक्षप्रवेश करत घरवापसी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिपेश म्हात्रे ठाकरे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर म्हात्रे यांनी उध्दव ठाकरे यांच्या प्रमूख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करत अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. डोंबिवली विधानसभेच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचे संकेत दिपेश म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर दिपेश म्हात्रे यांनी केलेला हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची याबाबत काय भूमिका असणार यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या या पक्ष सोडण्याच्या निर्णयावरूनही वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. मात्र दिपेश म्हात्रे यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475