महाराष्ट्र

अ.भा. म.सा. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर

अ.भा. म.सा. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर
अ.भा. म.सा. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर फोटो: ठाणे वैभव
पुणे: दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी घोषणा केली आहे, या सहाव्या महिला अध्यक्ष आहे. ९८ वर्षात सहा महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या. डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचं लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे. संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली होते. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475