जिल्हा

मुंब्र्यातील एमआयएमचे युनूस शेख शिंदे गटात

मुंब्र्यातील एमआयएमचे युनूस शेख शिंदे गटात
मुंब्र्यातील एमआयएमचे युनूस शेख शिंदे गटात फोटो: ठाणे वैभव

ठाणे: ‘कैसा हराया’ असे भाषण ठोकून संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यामुळे प्रसिद्ध झालेल्या ठाणे महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वडिल युनूस शेख यांनी शिंदे गटाच्या केबल सेनेत जाहीर प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्ष प्रवेशाचे छायाचित्रही सर्वत्र प्रसारित होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे, परंतु या प्रवेशाबाबत सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र तोंडावर बोट ठेवले आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा भागातील प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएम पक्षाच्या तिकीटावर सहर शेख या निवडून आल्या. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक होते. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे श्री. शेख यांनी आव्हाडांशी पंगा घेत एमआयएम पक्षात प्रवेश केला होता. याच पक्षातून सहरला निवडणुकीला उभे करत त्यांनी निवडून आणले. या विजयानंतर सहर शेखने केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली होती. “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य करत तिने आव्हाडांना डिवचले होते. तिच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली होती.

नगरसेविका सहर शेख यांचा जात दाखला बनावट असल्याचा आरोप झाला होता. त्यावर तिचे वडील युनूस शेख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा एक राजकीय डाव असल्याचा दावा करत “एकच सांगतो, करारा जवाब मिलेगा “असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला होता. त्यामुळे सहर पाठोपाठ तिच्या वडिलांचे विधानही चर्चेत आले होते.

युनूस शेख हे एमआयएम पक्षाचे काम करीत असून त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाचे छायाचित्रही समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. यामध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी युनुस शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना दिसत आहेत. युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. यावरुन युनूस यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली असतानाच, युनूस शेख यांनी मात्र चर्चेचे खंडण करत त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

''मी गेले ४० वर्षे केबल व्यवसाय करीत आहे. या व्यवसायामुळे मी अखिल भारतीय केबल सेनेचा सदस्य आहे. ही संघटना शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केली होती. या संघटनेने मला कळवा-मुंब्रा या विभागाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मी या भागातील इंटरनेट आणि केबल व्यवसायासंबंधीचे काम पाहणार आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नसून केबल सेनेचे कळवा मुंब्रा अध्यक्षपद मिळाले आहे. मी एमआयएम पक्षातच आहे", असे युनूस शेख यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475