क्रीडा

वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी: सौराष्ट्राचा सिक्कीमवर 7 गडी राखून विजय

वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी: सौराष्ट्राचा सिक्कीमवर 7 गडी राखून विजय
वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी: सौराष्ट्राचा सिक्कीमवर 7 गडी राखून विजय फोटो: ठाणे वैभव
उमेश्वरी जेठवाचे अर्धशतक आणि आयुषी पटेल आणि तीशा गोर यांच्या तीन विकेट्सच्या जोरावर सौराष्ट्राने शुक्रवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सिक्कीमचा सात विकेट्सने पराभव केला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमचा डाव 47.2 षटकांत 154 धावांत आटोपला. एकूण धावसंख्येपैकी 93 धावा समायता रॉय प्रधानने केल्या. मात्र, बाकीच्या फलंदाजांकडून तिला फारशी साथ मिळाली नाही. सिक्कीमला सौराष्ट्रच्या गोलंदाजी भारी पडली. पटेल (3/33), गोर (3/28) आणि कर्णधार धरणी थापेटला (2/25) यांनी कमालीचे प्रदर्शन केले. विजयासाठी 155 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना, जेठवा (58) आणि शिफा करीमभाई (38) या सलामीच्या जोडीने 66 धावांची भागीदारी करून शानदार सुरुवात केली. नंतर हिरवा वढेर (28) आणि धरणी (20*) यांनी उपयुक्त धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना सुरू होण्यापूर्वी सौराष्ट्र आणि सिक्कीम यांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेले ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळले. सुर्वे यांचे २४ जानेवारी रोजी निधन झाले. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील सामना रविवारी मिझोराम वूमेन्स अंडर 23 आणि ओडिशा वूमेन्स अंडर 23 यांच्यात होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475