जिल्हा

वडाळा ते कासारवडवली मेट्रोचे काम ८४ टक्के पूर्ण!

वडाळा ते कासारवडवली मेट्रोचे काम ८४ टक्के पूर्ण!
वडाळा ते कासारवडवली मेट्रोचे काम ८४ टक्के पूर्ण! फोटो: ठाणे वैभव
डिसेंबरमध्ये मार्ग खुला होण्याची शक्यता ठाणे : मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासारवडवली प्रकल्पांतर्गत माजिवडा येथे प्लिंथ टाकण्याचे काम सुरू झाले असून ८४ टक्के स्थापत्य कामे झाली आहेत. त्यामुळे प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत खुला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘एमएमआरडीएच्या अधिका-यांनी दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये प्राधिकरणाने सांगितले की, ‘लाईन 4अ वर 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल 2023 मध्ये, ग्रीन लाइन 4 प्रकल्पाची स्थिती 49टक्के होती. सप्टेंबर 2024 मध्ये माजिवडा येथे प्लिंथ टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. ‘हा मार्ग 32.32 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर एकूण 30 स्थानके असणार आहेत आणि या मार्गावर चेंबूर, भांडुप, मुलुंड आणि तीन हातनाका अशी स्थानके असतील. हा मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल यांच्याशी जोडला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475