जिल्हा
ममता डिसोझा, महादेव काळे यांना राष्ट्रपती पदक
ममता डिसोझा, महादेव काळे यांना राष्ट्रपती पदक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस अधिका-यांचा राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानाने गौरव केला आहे.
आयुक्तालयात नेमणूक असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसोझा (विशेष शाखा), तसेच उपनिरीक्षक महादेव काळे (विशेष शाखा) यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल रविवार,२६ जानेवारी २५ रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
त्याबद्दल त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंंदे आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ममता डिसोजा यांची पोलीस दलात ३४ वर्षे सेवा झाली असून त्या सन १९९० साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांना सेवा कालावधीमध्ये २९५ बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक महादेव काळे हे विशेष शाखेत असून सन १९८८ मध्ये ते पोलीस शिपाई पदावर रुजू झाले होते. त्यांच्या ३७ वर्षांच्या कालावधीत त्यांना १९० बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले तसेच पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने गौरवण्यात आले. सन २००० मध्ये गुन्हे शाखा घटक एक ठाणे शहर येथे कर्तव्यावर असतााना हिजबुल या दहशतवादी संघटनेचे चार अतिरेकी हे मुंब्र्यात मोठा घातपात करण्यासाठी शस्त्रासह लपले असल्याची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
300x450
300x600