महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांनी केले वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन

शालेय विद्यार्थ्यांनी केले वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन
शालेय विद्यार्थ्यांनी केले वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावीन 'वृक्षवल्ली 2024' या 13 व्या भव्य अशा झाडे, फुले, फळे, भाजीपाला या प्रदर्शनाचे उद्घाटन आज शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची प्रदर्शनास गर्दी केली असून सदरचे प्रदर्शन रेमंड रेस ट्रॅक, जे.के.ग्राम, पोखरण रोड नं. 1 येथे आयोजित केले करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त मिताली संचेती, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. या प्रदर्शनात कुंड्यामधील शोभिवंत पानांची झाडे (झुडपे), कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस), कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीस (कट फ्लॉवर) इतर असे एकूण 22 विभाग व पोटविभाग आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने व बागांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण 250 स्पर्धकांना भाग घेतला आहे. तसेच या प्रदर्शनात बागांची संबंधित वस्तु, उत्पादने, बांबूपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तू इत्यादीचे जवळ जवळ 40 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये लायन्स क्लब, मध्य रेल्वे, माहिम नेचर पार्क, एम.सी.एच.आय, लोढा ग्रुप, हिरानंदानी ग्रुप व इतर तसेच प्रत्‌येक नागरिकांनी असे एकूण 70 ते 80 संस्था व नागरिक यांनी या प्रदर्शनात भाग घेऊन देखावे तयार केलेले आहेत. "वृक्षवल्ली 2024" या प्रदर्शंनात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या प्रदर्शनास ठाणेकर नागरिकांना भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600