महाराष्ट्र

एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनात ३५ विकासक, १५० प्रकल्प

एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनात ३५ विकासक, १५० प्रकल्प
एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनात ३५ विकासक, १५० प्रकल्प फोटो: ठाणे वैभव
कल्याण : क्रेडाई एमसीएचआय कल्याण-डोंबिवली युनिटच्या गृह प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणा, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी घर घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना मिळणार आहे. त्यातही अवघ्या १६ लाखांपासून ते थेट १ करोड रुपयांपर्यंतच्या किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. माध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एससीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यंदाच्या एक्स्पोमध्ये ४० हुन अधिक विकासकांचे १५० हून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली बघता येणार आहेत. गेल्या काही वर्षाचा अंदाज पाहता या प्रदर्शनालाही २५ हजारांहून अधिक नागरीक भेट देतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे. यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंटसह प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉदेखील काढला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रणव भांबुरे यांनी केले. आजपासून सुरू झालेले हे प्रदर्शन येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आदी भेट देणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, अध्यक्ष भरत छेडा, रवी पाटील, सुनिल चव्हाण, अरविंद वरक, मिलिंद चव्हाण यांच्यासह अनेक नामांकित व्यावसायिकही उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475