जिल्हा

बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड

बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड
बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड फोटो: ठाणे वैभव
गरजू महिलांचा वापर; तीन महिलांना अटक बदलापूर : बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरात गरजू महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना सावंत यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. जोवेली भागातील नॅनो सिटी येथील एका इमारतीत सुलक्षणा गाडेकर यांच्या घरातून हे रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी बदलापूर पूर्व पोलिसांनी डॉ. ज्योत्सना सावंत यांच्या वैद्यकीय पथकासह संयुक्त धाड टाकली. धाडीत आरोपीच्या घरातून स्त्री बीजांची वाढ करण्यासाठी वापरली जाणाऱ्या ( लसी ) इंजेक्शन सापडली. गाडेकर ही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची सोनोग्राफी करून घेत असे. इंजेक्शन देऊन गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तेथे शस्त्रक्रिया विभागात अंडी काढून त्यांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४६) या तिघींना अटक केली असून रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात २० हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज असून त्यांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते. अधिक आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475