जिल्हा

ठाण्यातील अनधिकृत शाळांना ठोकणार टाळे

ठाण्यातील अनधिकृत शाळांना ठोकणार टाळे
ठाण्यातील अनधिकृत शाळांना ठोकणार टाळे फोटो: ठाणे वैभव
संचालकांवरही दाखल होणार अजामीनपात्र गुन्हे ठाणे: ठाण्यातील बेकायदशीरपणे सुरु असलेल्या ८१ शाळांना वार्षिक परीक्षा झाल्यानंतर टाळे ठोका, तसेच या शाळा चालवणाऱ्या संचालकांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर बेकायदा शाळा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ठाण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त बेकायदा शाळा या ठाणे महापालिका हद्दीत असल्याचे समोर आले आहे. या बेकायदा शाळांचा मुद्दा बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आला. यावर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, ठाणे महापालिका हद्दीत अशा प्रकारे ७५ बेकायदा शाळा आहेत. यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली असल्याचे राव यांनी सांगितले. बेकायदा शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांवर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार असल्याचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला. तर यातील काही शाळांना परवानगी देण्यास शासनाकडूनच टाळाटाळ होत असून शिक्षण विभागाने नियमात असलेल्या शाळांना तत्काळ परवानगी देण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. दरम्यान वार्षिक परीक्षा झाल्यानंतर या सर्व बेकायदा शाळांना टाळे ठोकण्याचे आदेश यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले. तर पुढील पंधरा दिवसात कारणमिमांसा करून ज्या शाळा बेकायदा पद्धतीनें सुरू आहेत त्या शाळांना कायमचे सिल करण्यात येणार आहे अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475