जिल्हा

उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक निवडणूक तीन दिवस लांबणीवर

उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक निवडणूक तीन दिवस लांबणीवर
उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक निवडणूक तीन दिवस लांबणीवर फोटो: ठाणे वैभव

​उल्हासनगर : महापालिकेतील बहुचर्चित सात स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २४ सप्टेंबर रोजी होणारी विशेष महासभा आणि निवडणूक प्रक्रिया आता तीन दिवस पुढे ढकलण्यात आली असून, ही निवडणूक २८ सप्टेंबरला पार पडणार आहे.

​पालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीची सत्ता असून, सात जागांपैकी भाजप चार तर शिवसेना तीन जागांवर लढत आहे. या जागांसाठी तब्बल ४२ अर्ज आले आहेत. महापौरांनी निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याने भाजपने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने २४ सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सात दिवसांची मुदत मागितली होती.

​सर्वोच्च न्यायालयाने महापौरांची याचिका फेटाळत सातऐवजी केवळ तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे रविवारी मुदत संपल्यानंतर सोमवारी (२८ सप्टेंबर) ही निवडणूक निश्चितपणे पार पडेल, अशी माहिती भाजप नेते राजेश वधारिया यांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इच्छुकांमधील उत्सुकता आणि राजकीय हालचाली आणखी ताणल्या गेल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475