जिल्हा
उल्हासनगर: शिवसेना महिला आघाडीचे सामूहिक राजीनामे
उल्हासनगर: शिवसेना महिला आघाडीचे सामूहिक राजीनामे
फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: पॅनल क्रमांक १३ मधील माजी नगरसेवक रमेश चव्हाण यांचे तिकीट कापून अलीकडेच पक्षात आलेल्या उमेदवारास उमेदवारी दिल्याने शिवसेना शिंदे गटात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासोबतच गेल्या २० वर्षांपासून महिला आघाडीत सक्रिय असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने महिला आघाडीने सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
माजी नगरसेवक रमेश चव्हाण हे प्रभाग क्रमांक १३ मधून सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांचे तिकीट कापून मनसेतून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या प्रदीप गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढला आहे. माजी नगरसेविका ज्योती माने यांचेही तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी कांता पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आणि महिला आघाडीतील पदाधिकारी नाराज झाले असून, याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475