जिल्हा

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध!

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध!
कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध! फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मतदानापूर्वीच भाजपाच्या तीन महिला उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18-अ (ओबीसी महिला राखीव जागा) मधून भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तसेच, डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 26-क मधून आसावरी नवरे यांचाही एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. या बिनविरोध विजयाची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. 31 प्रभागांतील एकूण 122 जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येनं अर्ज दाखल केले. मात्र, कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला राखीव जागा) साठी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्याशिवाय अन्य कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या जागेवर त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच, डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 26-क (ज्यामध्ये राजाजी पथ, शिव मार्केट, रामनगर, सावरकर रोड ) मधून भाजपाच्या आसावरी नवरे यांचाही एकमेव अर्ज दाखल झाला असून, त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच, भाजपाच्या रंजना पेडणेकर या डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 26 ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. या तिन्ही बिनविरोध विजयांमुळे भाजपने निवडणुकीपूर्वीच आपलं खातं उघडलं आहे. अशा स्थितीत आतापर्यंत कडोंमपामध्ये भाजपच्या तीन महिला उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475