जिल्हा
बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक गंभीर
बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक गंभीर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंब्रा येथील एम एम व्हॅली रोडवर एका बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला.
संगम पुलशरे (२१) आणि अविनाश दवंडे (१९) असे मृत्यू पावलेल्या दुचाकीवरील तरुणांची नावे आहेत. हे दोघेही ठाकूरपाडा येथील रहिवासी आहेत. तर महेश वारे (१८) राहणार ठाकूरपाडा हा गंभीर जखमी असून जवळील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारी मुंब्रा येथील एम एम व्हॅली रोडवर हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तीन तरुण स्कूटरवरून भरधाव वेगाने जात असताना बसची धडक दुचाकीच्या हँडलला बसली, त्यामुळे दुचाकी बसच्या पुढील चाकांखाली आली. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा तयार केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475