जिल्हा
सिडकोचा १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर
सिडकोचा १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : सिडको महामंडळाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 16,250 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून नवी मुंबई तसेच परिसरातील नियोजित शहरी विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा विस्तार, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी बळकटीकरण आणि गृहनिर्माण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना सिडकोने 9,774,23 कोटींचे सुधारित उत्पन्न आणि 9,770.26 कोटींचा खर्च नोंदवला असून रु. 3.97 कोटींचा अधिशेष साध्य केला आहे. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाही आर्थिक शिस्त राखल्याचे यावरून स्पष्ट होते. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 16,250 कोटींचे उत्पन्न आणि 16,150 कोटींचा खर्च अपेक्षित असून 100 कोटींचा अधिशेष अपेक्षित आहे.
नवीन वर्षात १९,३०० घरांची गृहनिर्माण योजना, कोंढाणे, हेटवणे आणि बालगंगा धरण, २० एकरवर आफ्रिका-भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकास, इंटिग्रेटेड लॉजीस्टिक्स पार्क, खारघर येथे १५५ हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, १०० हेक्टर क्षेत्रात मेडिसिटी, करंजाडे परिसरात १०० हेक्टर क्षेत्रात एड्युसिटी, २७० हेक्टर क्षेत्रात एरोसीटी, युनिटी मॉल आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475