जिल्हा
ठाण्यात तलावात बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
ठाण्यात तलावात बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यातील कासारवडवली परिसरातील तलावामध्ये एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनासह अग्निशामक दल त्याचबरोबर कासरवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारीही दाखल झाले. सर्वांच्या मदतीने तलावातील मुलाचा मृतदेह करुन सिविल रुग्णालयमध्ये पाठवण्यात आले आहे. या बारा वर्षीय मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा पाचवीत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
'ठाण्यातील कासारवाडीत धक्कादायक घ़ना घडली आहे. एक 12 वर्षाच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475