जिल्हा

कोंडीत अडकली रुग्णवाहिका; महिलेने घेतला अखेरचा श्वास!

कोंडीत अडकली रुग्णवाहिका; महिलेने घेतला अखेरचा श्वास!
कोंडीत अडकली रुग्णवाहिका; महिलेने घेतला अखेरचा श्वास! फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: गायमुख येथील वाहतूक कोंडीमुळे एका महिलेला रुग्णवाहिकेमध्ये अखेरचा श्वास घ्यावा लागला. या घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे. छाया पुरव (गुरव) असे या महिलेचे नाव असून त्या पालघर तालुक्यामधील सफाळे येथील मधुकर नगरमध्ये आल्या होत्या. छाया पुरव या मूळच्या सफाळ्याच्या असून मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या. सुट्टीसाठी त्या मूळ गावी आल्या होत्या. पालघर जिल्हा परिषदेची शाळा आणि घराजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. अचानक झाडाची फांदी कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना पालघरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीममधील हिंदुजा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडे जाताना घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे छाया पुरव असलेल्या रुग्णवाहिकेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. वास्तविक हे अंतर 100 किलोमीटर असून त्यासाठी अडीच तास लागतात. मात्र, प्रचंड वाहतुकीमुळे तीन तासांत रुग्णवाहिकेने निम्मेच अंतर पार केले होते. त्यातच त्यांना दिलेल्या अनेस्थेशियाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला होता. अखेरीस छाया पुरव यांच्या पतीने त्यांना मिरा रोडमधील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी छाया पुरव यांना मृत घोषित केले. रुग्णवाहिका वेळेत इस्पितळात पोहोचली असती, तर छाया पुरव यांचे प्राण कदाचित वाचले असते. या घटनेमुळे महामार्गावरील दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनावरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475