जिल्हा

दिवंगत सतीश प्रधान यांना ठाणे महापालिकेत श्रद्धांजली

दिवंगत सतीश प्रधान यांना ठाणे महापालिकेत श्रद्धांजली
दिवंगत सतीश प्रधान यांना ठाणे महापालिकेत श्रद्धांजली फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली. सतीश प्रधान यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी निधन झाले. सोमवार, ३० डिसेंबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ठाण्याचे सुपूत्र सतीश प्रधान यांचे ठाणे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौरपद भुषविले. ते २१ मार्च १९८६ ते ३० मार्च १९८७ या काळात महापौर होते. तत्पूर्वी, ठाण्याचे नगराध्यक्ष आणि महापौरपदानंतर राज्यसभेचे दोनदा खासदार झाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475