जिल्हा

भिवंडीत आरटीओकडून २५ बेकायदेशीर रिक्षा जप्त

भिवंडीत आरटीओकडून २५ बेकायदेशीर रिक्षा जप्त
भिवंडीत आरटीओकडून २५ बेकायदेशीर रिक्षा जप्त फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : शनिवारी भिवंडीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करून कागदपत्रांविना व्यवसाय करणाऱ्या २५ रिक्षा जप्त केल्या. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या निमित्ताने उपाययोजना करण्यासाठी शहरातील वाहतूक विभागाच्या कार्यालयात आमदार महेश चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (२६डिसेंबर) बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, भिवंडी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शरद ओहोळ, पोलीस निरीक्षक सुधाकर खोत, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाजसेवक अशोक जैन आणि माजी नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्यासह भिवंडीकर नागरिक उपस्थित होते. भिवंडी शहरात येण्यासाठी व शहराबाहेर जाण्यासाठी अंजूरफाटा ते नदीनाका आणि कल्याणरोड ते साईबाबा बायपास हे दोन रहदारीचे प्रमुख मार्ग असून या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश चौघुले यांनी वाहतूक विभागाला विविध सूचना करून कामात सुधारणा करून निर्णय घेण्यास सांगितले. उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या ठिकाणी अधिकचे कर्मचारी ठेवण्याच्या सूचना स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांना केल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा तसेच स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करावे, असे सांगितले. या बैठकीमध्ये घेतलेल्या उपाययोजनेचा आढावा १५ जानेवारीपर्यंत घेण्यात येणार असून त्यानंतर सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार महेश चौघुले यांनी दिला. काल शनिवार रोजी भिवंडीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भिवंडीत दाखल झाले आणि त्यांनी जकातनाका, तीनबत्ती, वंजारपट्टी नाका आणि एस. टी. स्थानक या ठिकाणी रिक्षांची सक्तीने तपासणी करीत विनाकागदपत्रे असलेल्या २५ रिक्षा जप्त करून त्या एस. टी. स्थानकातील दुरुस्ती विभागाच्या जागेत ठेवल्या. त्या रिक्षा स्क्रॅबमध्ये काढणार असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे अवैध वाहन चालविणाऱ्या चालक आणि मालकांमध्ये घबराट पसरली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475