जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन लाच घेताना ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन लाच घेताना ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन लाच घेताना ताब्यात फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्या नियोजन भवन कार्यालयात असलेल्या अव्वल कारकून लोकसेवक संतोष प्रधानला (50) अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. प्रधानने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. यातील तक्रारदार यांचा राईस मिलचा व्यवसाय आहे. ते पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय येथे त्यांचा करारबद्ध मिलर्स आहेत. महामंडळाकडून येणारा धान गिरणीमध्ये नेऊन व भरडाई करून तयार झालेला तांदूळ (सीएमआर) शासकीय गोदामांमध्ये जमा करण्यात येतो. त्याप्रमाणे तक्रारदार व ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामध्ये करारनामा झाला आहे. करारानुसार भात शहापूर येथील शासकीय गोदामातून आणून त्याची भरडाई करून, तयार तांदूळ पुन्हा शासकीय गोदामामध्ये जमा करण्यात येतो, परंतु भरडाई करून तयार तांदूळ शासकीय गोदामामध्ये जमा करण्यापूर्वी संबंधित तांदळाचे नमुने ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी हे ठाणे कार्यालयातील संबंधित अधिकार प्रधान हे तपासणीसाठी नमुना घेऊन जातात व तपासणी करून त्याबाबत कळवतात. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालयातील प्रधानने 31 जुलै 23 रोजी तक्रारदार यांच्या मेलमध्ये भरडलेल्या शासकीय भातामधील तांदळाच्या नमुन्यास मंजुरी देण्याकरता त्यांच्याकडे पाच हजार रुपये रकमेची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याकरता ‘ठाणे अँटी करप्शन ब्युरो’ येथे 31 जुलै 23 रोजी लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने 1 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या पडताळणीमध्ये लोकसेवक संतोष प्रधान यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे प्रलंबित ठेवले. त्या अनुषंगाने ठाणे विभागाच्या एसीबीने 08 आॅगस्ट 23 रोजी सापळ्याचे आयोजन केले आणि लोकसेवक यांना तक्रारदार यांच्याकडून 2500 रुपये स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे 12.50 वाजता रंगेहात पकडले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475