जिल्हा

मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली; नवी मुंबईत दोन दिवस पाणीसंकट

मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली; नवी मुंबईत दोन दिवस पाणीसंकट
मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली; नवी मुंबईत दोन दिवस पाणीसंकट फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी अजीवली गावाजवळ बुधवारी सकाळी फुटल्याने शहरात दिवसभर पाणी संकट जाणवले. मंगळवारीच मनपाने जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीकरीता पाणी बंद ठेवले होते. दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईकरांवर सलग दोन दिवस पाणी संकट ओढवले. नवी मुंबई महापालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम मंगळवार ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यामुळे एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार होता. या पाणी पुरवठ्याला पहाटे सुरुवात होताच पुन्हा एकदा अजिवली गावाजवळ जलवाहिनी फुटली. यामुळे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करून तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीचे काम सायंकाळपर्यंत सुरू राहणार असल्याने शहरात संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली. आधीच एक दिवस देखभाल दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईकरांवर सलग दोन दिवस पाणी संकट ओढवले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475