महाराष्ट्र

गुरूवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी नाही

गुरूवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी नाही
गुरूवारी नवी मुंबईत दिवसभर पाणी नाही फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरणावरील मोरबे धरण ते दिघा या मुख्य जलवाहिनीवर तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने गुरूवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत पाणी बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच कामोठे व खारघर या विभागात २६ सप्टेंबर २०२४ रोजी दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही. दुरुस्तीचे काम केल्यानंतर शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ रोजी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475