जिल्हा

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत
नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत फोटो: ठाणे वैभव
म्हारळमधील विद्यार्थिनी सीबीआयच्या रडारवर कल्याण: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची धग आता कल्याणपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कल्याणमधील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयच्या विशेष पथकाने संबंधित विद्यार्थिनीच्या घरी भेट देत तिचा जबाब नोंदवला. तपासात आधीपासूनच संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या कॉल डिटेल्स आणि संपर्कांची छाननी करताना या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर या संपर्काच्या आधारे सीबीआयचे पथक कल्याणमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थिनीची सखोल चौकशी करण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी आणि संशयित विद्यार्थी यांच्यातील संपर्काचे स्वरूप काय होते, तसेच त्याचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. या संदर्भात विद्यार्थिनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या मुलीचा एका विद्यार्थ्यासोबत संपर्क होता आणि त्याच कारणामुळे तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआय अधिकाऱ्यांनी घरी येऊन प्राथमिक चौकशी केल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीचा थेट सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिची भूमिका केवळ संपर्कापुरती मर्यादित होती की पेपरफुटी रॅकेटशी तिचा काही संबंध होता, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर कल्याणमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475