कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचे फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे असते. व्यवसायात जोखीम ही पत्करावी लागतेच. परंतु कॅटरिंग हा असा व्यवसाय आहे ज्याला मरण नाही. पूर्वी लग्नकार्यासाठी कॅटरिंग व्यवस्था उपयोगी पडत होती मात्र हल्ली सर्रास घरगुती कार्यक्रमांपासून, वाढदिवस, साखरपुडा, गेट टू गेदरसाठी जेवणाच्या ऑर्डर्स दिल्या जातात. निवेदिता प्रधान यांनी २०१६ मध्ये पती सुशांत प्रधान आणि सासूबाईंच्या मदतीने कॅटरिंग व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होत्या. सुशांत प्रधान यांना स्वयंपाकाची विशेष आवड होती आणि त्यांनीच व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचवली. त्यांच्या पाठिंब्याने आणि सासूबाईंच्या सहकार्याने निवेदिता यांनी हा व्यवसाय सुरू केला. निवेदिता प्रधान यांच्या कॅटरिंग व्यवसायाची सुरुवात समीर गुप्ते यांच्या सीकेपी फूड फेस्टमधून झाली. सुरुवातीला घरीच स्वयंपाक करून त्या डबे पुरवत असत. त्यातून ठाण्यातील पहिले सेंट्रलाइज्ड किचन त्यांनी उभारले. कालांतराने त्यांनी विविध कार्यक्रम, लग्न, मुंज यांसाठीही कॅटरिंग सेवा पुरवायला सुरुवात केली. आज त्यांचा व्यवसाय फक्त डब्यांपुरता मर्यादित न राहता, दररोज दोन हजारहून अधिक लोकांना त्यांच्या माध्यमातून अन्न पुरवले जाते. २०१९-२० च्या कोरोना महामारीत कामगार गावी परतल्यामुळे अडचणी आल्या, पण त्याच काळात त्यांना कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी जेवण देण्याची संधी मिळाली. स्थानिक रहिवासी आणि मावशींच्या मदतीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर जेवण दिले. लॉकडाऊन संपल्यानंतर व्यवसाय पूर्ववत झाला आणि अधिक वेगाने वाढला. आज त्यांच्या कॅटरिंग सेवेचा विस्तार संपूर्ण मुंबईत झाला आहे. जेथे मोनोपोली सिस्टम नाही, त्या प्रत्येक हॉलमध्ये त्यांचे जेवण उपलब्ध आहे. पारंपरिक जेवणासोबतच आधुनिक पदार्थही त्या पुरवतात. विशेषतः त्यांच्याकडील वालाच्या बिरड्याला मोठी मागणी आहे. त्यांच्या मेहनतीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१७-१८ मध्ये अर्थसंकेतचा "उद्योजक घडवले" पुरस्कार आणि २०२० मध्ये अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू स्टार्टअप अवॉर्ड त्यांना मिळाला.
GENERAL
स्वयंपाकाच्या आवडीतून सुचली कॅ टरिग व्यवसायाची संकल्पना
स्वयंपाकाच्या आवडीतून सुचली कॅ टरिग व्यवसायाची संकल्पना
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475