GENERAL

मेंदी कला सातत्याने जपणारी 'श्रद्धा'

मेंदी कला सातत्याने जपणारी 'श्रद्धा'
मेंदी कला सातत्याने जपणारी 'श्रद्धा' फोटो: ठाणे वैभव

मेंदी ही एक पारंपारिक भारतीय कला आहे, जी केवळ सौंदर्याचा भाग नाही, तर ती एक अभिव्यक्ती आणि वधूच्या विवाहप्रसंगी शुभतेचे प्रतीक आहे. या कलेला पारंपारिकतेच्या पलीकडे एक नवा आयाम मिळवून देणाऱ्या श्रद्धा मोरे यांचा मेंदी कलेचा प्रवास केवळ कला प्रेमींसाठीच नव्हे, तर नवोदित कलाकारांसाठी देखील एक प्रेरणा ठरला आहे. श्रद्धा मोरे एक प्रसिद्ध मेंदी आर्टिस्ट आहेत. त्यांचा मेंदी कलेचा प्रवास त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात सुरू झाला. वेगवेगळ्या डिझाईन्सचे आकर्षण असल्यामुळे त्यांना या कलेची गोडी लागली. मेंदी कलेला व्यावसायिक दिशा देण्यासाठी श्रद्धा या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात, विशेषत: इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले फोटो अपलोड करण्याऐवजी, आपल्या कलेचा व्यवसायासाठी कसा वापर करता येईल याविषयीची सगळी माहिती भावाकडून गोळा करून त्यांनी त्यांच्या या मेंदी कलेचे ब्रँडिंग केले आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज डिझाईन्स तयार करणे, ज्यामुळे प्रत्येक डिझाईन खास आणि अनोखे बनते. वधूसाठी डिझाईन निवडताना श्रद्धा मुख्यतः वधूच्या आवडीवर लक्ष केंद्रित करतात. वधूच्या संपूर्ण मेंदीसाठी साधारणपणे ६ ते ७ तास लागतात. मेंदीचा रंग गडद होण्यासाठी श्रद्धा काही टिप्स देखील आपल्या ग्राहकांना देतात. "लवंगाची धुरी मेंदीचा रंग चढण्यासाठी उत्तम उपाय आहे. तसेच, विक्स आणि बामचा वापर देखील मेंदीच्या रंगाला गडद करण्यास मदत करतो," असे श्रद्धा सांगतात. मेंदी ही कला पारंपारिक असली तरी तिला नव्या तंत्रज्ञानाने आणि सर्जनशीलतेने एक नवा आयाम मिळालेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्येक कलाकार आपली कला जगभर पोहोचवू शकतो आणि आपले काम एक ब्रँड बनवू शकतो. श्रद्धा यांचा हा मेंदी कलेचा प्रवास नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणा ठरला आहे. श्रद्धा यांना विविध सेलिब्रिटी वधूची मेहेंदी काढण्याची संधी देखील मिळाली आहे. ज्यामुळे त्यांच्या कलेला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लग्नसराईचा सिझन नसताना त्या मेहेंदीचे वर्कशॉप घेतात आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा देतात. "ऑनलाइन उपस्थिती निर्माण करा. तुमचे काम प्रदर्शित करण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ब्रँड तयार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा. त्याचबरोबर कुठलीही कला छोटी किंवा मोठी नसते. कलेमध्ये सातत्य महत्त्वाचे आहे आणि प्रामाणिकपणाची जोडच तुम्हाला यश मिळवून देऊ शकते," असा सल्ला श्रद्धा यांनी नवोदित मेहेंदी कलाकारांना दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475