जिल्हा

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचे राज्यपालांकडून होणार प्रकाशन

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचे राज्यपालांकडून होणार प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचे राज्यपालांकडून होणार प्रकाशन फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चरित्रग्रंथ तयार करण्यात आले असून या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. या चित्रग्रंथाचे लेखन व संकलन प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ, डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले असून, सहाय्य राजन बने आणि सानवी ओक यांनी केले आहे. हा प्रकाशन सोहळा मंगळवार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475