जिल्हा
बीएची परीक्षा आजपासून सुरू होणार
बीएची परीक्षा आजपासून सुरू होणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : सोशल मीडियावर मंगळवारी तृतीय वर्ष बीए सत्र ६ ची परीक्षा पुढे ढकलल्याचा संदेश दिवसभर व्हायरल होत होता. तो चुकीचा संदेश फिरत आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. बीएमएमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असेही प्रवक्ते म्हणाले.
तृतीय वर्ष बीए सत्र ६ ची परीक्षा नियोजित तारखेनुसार बुधवार, १२ एप्रिल २०२३ रोजी सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहेत. तरी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, या अफवेला बळी न पडता परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475