जिल्हा

इच्छुकांसाठी महापालिकेचे मागचे दार ५ मार्चला उघडणार

इच्छुकांसाठी महापालिकेचे मागचे दार ५ मार्चला उघडणार
इच्छुकांसाठी महापालिकेचे मागचे दार ५ मार्चला उघडणार फोटो: ठाणे वैभव
स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षश्रेठींकडे फिल्डिंग ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या ज्येष्ठ, अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाचे मागचे दार ५ मार्चला उघडणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिकीट देण्यावरून सर्वच राजकीय पक्षात आणि विशेष करून शिवसेना-भाजप पक्षामध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता येत्या ५ मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश आणि बक्षीस म्हणून उमेदवारीही दिल्याने शिवसेनेच्या अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवकांना देखील उमेदवारीला मुकावे लागले होते. अशा ज्येष्ठ आणि पक्ष इच्छुकांना स्विकृत म्हणून आमंत्रित करण्यास प्राधान्य मिळायला हवे, असा मतप्रवाह जुन्या-जाणत्या शिवसैनिकांमध्ये वाहत आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले आहे. संख्याबळानुसार, शिंदे गटाच्या शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील सहा जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. उबाठा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून एकालाही ही लॉटरी लागणार नाही. भाजपचे २८ नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून दोन, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाचा एक अशा १० जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. मात्र ही लॉटरी कोणाला लागणार हे येत्या ५ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची संख्या पक्ष संख्याबळ स्वीकृत नगरसेवक शिवसेना ७५ ६ भाजप २८ २ शरद पवार गट १२ १ राष्ट्रवादी (अ. प.) ८ १

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475