जिल्हा

ठामपाचा नियोनशून्य कारभार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

ठामपाचा नियोनशून्य कारभार; ठाकरे गटाचा हल्लाबोल
ठामपाचा नियोनशून्य कारभार; ठाकरे गटाचा हल्लाबोल फोटो: ठाणे वैभव
मुख्यालयासमोर अनोखे आंदोलन ठाणे: पहिल्याच पावसात ठाण्यात पाणी तुंबणे, झाडे, होर्डिंग पडणे आदी घटना घडत असून यास पालिकेचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने महापालिका मुख्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. आंदोलनावेळी महानगर संघटक महेश कदम यांनी अंगावर झाडाच्या फांद्या घेऊन मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पडून नागरिकांवर झाडे कोसळण्याच्या घटनांचे प्रतीकात्मक सादरीकरण केले. या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी धोकादायक वृक्षांची छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे झाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहरप्रमुख अनिश गाढवे यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. डबल डेकर बसच्या मार्गांवरील झाडांची छाटणी प्राधान्याने करण्यात आली, मात्र अंतर्गत रस्ते आणि निवासी भागांतील धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आठवडाभरात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475