जिल्हा

मीरा रोडमध्ये सिलेंडर स्फोटात दहा झोपड्या जळून खाक

मीरा रोडमध्ये सिलेंडर स्फोटात दहा झोपड्या जळून खाक
मीरा रोडमध्ये सिलेंडर स्फोटात दहा झोपड्या जळून खाक फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा रोड येथे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या झोपड्यांना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे दोन ते तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात एका विकासकाची मोकळी जागा आहे. या जागेत विकासकाने आपल्या कामगारांसाठी सुमारे वीस ते पंचवीस पत्र्याच्या झोपड्या उभारल्या होत्या. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास यातील एका झोपडीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यावेळी या झोपड्यांमध्ये दोन-तीन मजूर उपस्थित होते. भर दुपारी लागलेल्या आगीने झपाट्याने पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे झोपड्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन ते तीन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सुमारे तासाभरात आग नियंत्रणात आणली. मात्र या लागलेल्या आगीत आठ ते दहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475