जिल्हा

दोन लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड

दोन लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड
दोन लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड फोटो: ठाणे वैभव

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मोफत शिधा संच

ठाणे: दुष्काळग्रस्त बळीराजाच्या घरी सणासुदीच्या आनंदात कुठलीही उणीव भासू नये, म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक आणि लक्षवेधी पाऊल उचलले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल दोन लाखांहून अधिक दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत शिधा संच वाटप करण्यात येणार असल्याने त्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

या विशेष उपक्रमाच्या तयारीचा आणि वितरणाचा आढावा घेण्यासाठी आज, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष उपक्रमाच्या तयारी स्थळाची पाहणी केली. प्रत्येक साहित्याची व्यवस्थित बांधणी होत आहे की नाही, गरजवंतांपर्यंत ती वेळेत पोहोचेल का, याची पाहणी करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कडक निर्देश दिले. 

ठाणे-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर येथे महिला बचत गटांच्या हजारो महिलांनी एकत्र येऊन या उपक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महिला सक्षमीकरणाचा हा अनोखा संगम साधत तयार करण्यात आलेल्या या दिवाळी भेटीमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो वनस्पती घी, एक किलो मैदा, एक किलो बेसन, सुगंधित उटणे, लक्ष्मीची पावले, नवीन वर्षाची दिनदर्शिका, सणाची पणती, आवश्यक शिधा व सणासुदीच्या इतर वस्तूंचा समावेश आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही भेट धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरात आदराने पोहोचवली जाईल. या कामात कोणतीही कसर राहू नये, यासाठी सर्व शिवसैनिकांना युद्धपातळीवर कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

मागील वर्षीही धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गाईंचे वाटप करून त्यांना आर्थिक स्थैर्याचा आधार देणारे मंत्री सरनाईक यंदा देखील दिवाळीची थेट प्रत्येकाच्या घरी पोहोचवणार आहेत. केवळ ओवळा-माजिवडा (मतदारसंघ क्र. १४६) आणि मिरा-भाईंदर (मतदारसंघ क्र. १४५) या मतदारसंघांतीलच नव्हे, तर धाराशिवच्या कानाकोपऱ्यातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475