जिल्हा

टिटवाळ्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या

टिटवाळ्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या
टिटवाळ्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या फोटो: ठाणे वैभव
कल्याण: टिटवाळ्यात मुंबई पोलिस दलातील कार्यरत असलेल्या एका हवालदाराने पहाटेच्या सुमारास रेल्वे पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भाऊराव ढगे (४२) असे मृत हवालदाराचे नाव असून ते पंचवटी परिसरातील गीतांजली बिल्डिंग, रूम क्रमांक १०३ येथे वास्तव्यास होते. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूर येथील रहिवासी असून मुंबईतील येलोगेट पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, ढगे हे काल आपल्या मूळ गावी जाऊन परतले होते. मात्र, आज पहाटे त्यांनी टिटवाळ्यातील रेल्वे पुलाखाली गळफास घेतल्याचे समोर आले. सकाळी ही बाब लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून टिटवाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475